वर्ध्यात हरणाच्या मटनावर ताव मारणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. वर्ध्यात हरणाची शिकार करून हॉटेलात पार्टी सुरु होती. वर्ध्याच्या सावंगी येथील ठाकरे किचन मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरणाची शिकार करून पार्टी करणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना वनविभागाने अटक केली आहे.
वर्ध्यात हरणाची शिकार करून हॉटेलात पार्टी करणाऱ्यांना ही पार्टी चांगलीच भोवली आहे. वर्ध्याच्या सावंगी येथील ”ठाकरे किचन” मध्ये ही हरिणाच्या मटणाची पार्टी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरणाची शिकार करून पार्टी करणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत दोन आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
हरीणाच्या मटन पार्टी मध्ये बिल्डर झाले सामील
हरीणाच्या मटन पार्टी मध्ये शहरातील बिल्डरांचा देखील समावेश असल्याची वनविभागात चर्चा रंगली आहे. हरणाच्या शिकारीचा मुख्य आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. वर्ध्याच्या आंजी परिसरातून हरणाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती वनविभागाने दिली आहे. सावंगीच्या टी पॉईंट चौकातील ”ठाकरे किचन” यांच्या हॉटेल मध्ये हरणाच्या मटणाची पार्टी झाल्याचं तपासात पुढे आले आहे. अर्जुन सिंग राहणार आंजी (मोठी) येथील मुख्य आरोपी असल्याची वनविभागाकडून सांगण्यात आले असून हरणाच्या मटनावर ताव मारणाऱ्या आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
विश्वभारत News Website