Breaking News

BJP खासदार अशोक नेतेंच्या वाहनाला भीषण अपघात : सीटबेल्ट व एअरबॅग…

Advertisements

गडचिरोली-चिमूरचे भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली. मात्र, ‘सीटबेल्ट’चा वापर केल्याने वेळीच ‘एअरबॅग’ उघडले आणि खासदार नेते, चालक व सुरक्षारक्षक बचावले. नागपूरजवळील विहिरीगाव जवळ हा अपघात घडला.

Advertisements

खासदार अशोक नेते हे ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून ४ नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर आले व समोरासमोर जोराची धडक झाली. यावेळी खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते.

Advertisements

खासदार नेते हे समोरील सीटवर होते. त्यांच्यासह चालकाची एअरबॅग उघडली, त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवासी सुखरूप बचावले. यानंतर मोठी गर्दी झाली. पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. नेते हे सहकाऱ्यांसमवेत दुसऱ्या वाहनाने गडचिरोलीत पोहोचले. दरम्यान खासदार नेते यांना विचारणा केली असता त्यांनी सुखरूप असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *