Breaking News

कोण आहेत नवे अधिकारी?अजित पवार यांचे नागपुरात कार्यालय सुरू

Advertisements

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, नागपूर जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे सुरु करण्यात आले आहे. सचिन यादव हे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

Advertisements

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात कार्यालय असून त्यांनी तेथे विशेष कार्यसीन अधिकारी नियुक्त केला आहे. त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात कार्यालय सुरू केले आहे. पक्ष वाढीचा एक भाग म्हणून हे कार्यालय उघडण्यात आले आहे.

Advertisements

नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिक स्तरावरच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशाने, अजित पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागपूरमधील नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरच, मंत्रालयाशी संबंधित त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे. विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी सचिन यादव यांच्याशी दु. क्र. ९४२१२०९१३६ वर संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *