Breaking News

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

Advertisements

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ६० वर्षीय स्वयंघोषित वैद्याच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

 

पीडित तरुणी २२ वर्षांची असून मुंबईत राहते. याप्रकरणी तिने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार नालासोपारा पश्चिमेच्या छेडा नगर येथील गौरव गॅलक्सी अपार्टमेंट मध्ये बाबासाहेब पाटील हा डॉक्टर मूळव्याधीवर इलाज करतो. मंगळवारी ती उपचारासाठी पाटील याच्याकडे आली होती. त्यावेळी पाटील याने पीडितेकडे शरिरसुखाची मागणी देखील करून नंतर तिच्याशी लैंगिक कृत्य केले. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी बाबासाहेब पाटील याच्याविरोधात बलात्कार (कलम ३७६) आणि विनयभंग (कलम ३५४) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

बाबासाहेब पाटील नाशिक येथे राहणारा असून दर आठवड्याला नालासोपाऱ्यात उपचारासाठी येत असल्याने इमारतीच्या रहिवाशांनी सांगितले. पाटील हा डॉक्टर नसून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही. मात्र तो वैद्य असल्याचा दावा करून मागील ३० वर्षांपासून मुळव्याधीवर उपचार करत असल्याचे सांगत असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहाय्याक पोलीस निरीक्षक प्रमोद कदम यांनी दिली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *