नागपुरात भाजप आमदाराच्या बहिणीचे नाव मतदार यादीतून वगळले

मागील आठवड्यात नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान शांततेत पार पडले. मात्र मतदार यादीतील घोळ सध्या चर्चेत आहे. यादीतून परस्पर नावे वगळल्याने अनेक जण मतदानापासून वंचित राहिले. याचा फटका भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके यांच्या कुटुंबियांना बसला.

नागपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी ५४ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ७५ टक्के व्हावी म्हणून प्रशासनाने प्रयत्न केले होते. त्यानंतरही मतदान कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मतदार यादी अचूक व्हावी म्हणून प्रशासनाने मृत, स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून गाळली, पण त्यासोबत हयात असणारे व नियमित मतदान करणाऱ्या मतदारांचीही नावे वगळण्यात आली. याचा मोठा फटका सर्व सामान्य मतदारांबरोबरच नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके यांच्या कुटुंबियांना बसला. त्यांच्या भगिनी मतदानापासून वंचित राहिल्या.

दटके कुटुंबियांचे मतदान मध्य नागपुरातील दक्षिणमूर्ती चौकातील एका शाळेत होते. दटके यांच्या मोठ्या भगिनी प्रणिती दटके मतदानासाठी केंद्रावर गेल्या. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत नव्हते. त्यांनी चौकशी केली असता वगळलेल्या मतदारांच्या यादीत त्यांचे नाव होते. विशेष म्हणजे त्यांचे नावही चुकवले. पतीऐवजी वडिलांचे नाव टाकण्यात आले. हजारो नावे अशाच प्रकारे चुकवण्यात आली. मतदार यादी दुरुस्तीचे व नवीन नावे समाविष्ट करण्याचे काम निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीपासून केले जाते. तरीही अनेक चुका यादीत कायम आहेत.

About विश्व भारत

Check Also

सुधीरभाऊंसाठी ‘लाडक्या बहिणी’ बनल्या रणरागिणी

बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू …

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *