Breaking News

नागपुरात रेल्वे एक्सप्रेसमध्ये तरुणीसोबत केले अश्लील चाळे

Advertisements

गीतांजली एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. विनोद सलगे (३५) रा. देशपांडे ले – आऊट असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. विद्यार्थिनी उच्चशिक्षित असून मूळची अकोल्याची आहे. शिक्षणासाठी ती नागपुरात राहतेे. घरी जाण्यासाठी ती नागपूर रेल्वे स्थानकावर आली. तिकीट घेतले आणि गाडीच्या प्रतीक्षेत होती.

Advertisements

विनोद हा देखील अकोल्याला जात होता. तो विम्याचे काम करतो. पीडितेशी तो बोलण्याचा प्रयत्न करीत होता. प्रवासी म्हणून ती सुध्दा बोलली. दरम्यान, फलाट क्रमांक तीनवर गाडी आली. विनोदही तिच्या मागावर होता. भ्रमणध्वनी क्रमांक मागत होता. यादरत्याने त्याने तिचा विनयंभंग केला. या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थिनीने कुटुंबीयांना माहिती दिली. अकोला रेल्वे स्थानकावर नातेवाईक आले व आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *