Breaking News

1 जूनपासून मोठे बदल : तुमच्या खिशावर थेट परिणाम

Advertisements

पेट्रोल- डिझेल, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल

Advertisements

एलपीजीची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवली जाते. १ जून रोजी कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती ठरवणार आहेत. मे महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. आता जूनमध्येही कंपन्या पुन्हा एकदा सिलिंडरच्या किमती कमी करू शकतील अशी अपेक्षा आहे. 1 जून रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होणार आहेत.

Advertisements

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ला जाण्याची गरज नाही

1 जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओमध्येच परीक्षा द्यावी लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे सोपे होणार आहे. कारण तुम्ही सरकार मान्य ड्राईव्हिंग सेंटरमध्ये देखील टेस्ट देऊ शकणार आहात.

वाहतुकीचे नियम कडक होणार

नव्या नियमांनुसार आता वाहतुकीचे नियमही कडक होणार आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या शिवाय परवाना देखील रद्द होऊ शकतो आणि 25 वर्षे नवीन परवाना मिळू शकणार नाही. याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे. ज्यामध्ये वेगात गाडी चालवल्यास 1000 ते 2000 रुपये, विना परवाना वाहन चालवल्यास 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड आकारला जाईल.

14 जूनपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI नुसार, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhar card update online) 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल, तर तुम्ही 14 जूनपर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. UIDAI पोर्टलवर आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली जात आहे. मात्र, 14 जूननंतर तुम्हाला या कामासाठी पैसे द्यावे लागतील. तुम्ही हे काम आधार केंद्राला भेट देऊन देखील करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेल्यास तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर UIDAI पोर्टलवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

जूनमध्ये एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या

जून महिन्यात बकरी ईद, वट सावित्री पोर्णिमा यासह विविध सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या (लोकसभा) सातव्या टप्प्यात एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. देशात 1 जून रोजी बँकांना सुट्टी असेल. बँका बंद राहतील, या काळात तुम्ही बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आधीच करुन घ्यावीत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

न्यूज प्रसार सेवा मे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टल न्यूज आगे

न्यूज प्रसार सेवा मे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टल न्यूज आगे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

यूट्यूब-सोशल मीडिया पोर्टल बातम्या वृत्तप्रसारामध्ये आघाडीवर

यूट्यूब-सोशल मीडिया पोर्टल बातम्या वृत्तप्रसारामध्ये आघाडीवर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक.रिपोर्ट मुंबई. यूट्यूब, सोशल मीडिया पोर्टल, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *