Breaking News

नागपूरजवळील वाघासाठी अभिनेत्री रविना टंडनचा ‘कॉल’

Advertisements

जंगलात शिकारीसाठी बाहेर पडलेल्या वाघाची चाहूल लागताच माकड किंवा हरीण यासारखे प्राणी मोठ-मोठ्याने आवाज करून इतर प्राण्यांना सावध करतात. याला ‘अलार्म कॉल’ असे म्हणतात. वाघासाठी इतर प्राणी असे ‘कॉल’ देत असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र भंडारा जिल्ह्यातील दोन जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ वाघासाठी खुद्द अभिनेत्री रविना टंडन हिने ‘कॉल’ केला. रविना टंडन यांच्या ‘कॉल’ मुळेच त्या वाघाला कोका जंगलात सोडण्यात आल्याचे एका वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisements

 

Advertisements

सुहानी वाघिणीच्या दोन बछाड्यांपैकी २२ महिन्यांचा एक तरुण बछडा सध्या एखाद्या मादीच्या शोधात असून स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी नवीन जंगलाच्या शोधात भटकंती करीत आहे. दवडीपार, धारगाव, कोतुर्ली, पुरकाबोडी, किटाडी, मांगली असा मुक्तसंचार करीत नवेगाव मार्गे गडचिरोलीतील जंगलाकडे त्याचा प्रवास सुरू होता. तीन आठवड्यांपूर्वी तो भंडारा वन विभागाच्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतुर्ली गावात आणि नंतर किटाडी वनपरिक्षेत्रांतर्गत हरदोली तई या गावात पोहचला. कोतुर्ली आणि तई या दोन्ही ठिकाणी या वाघाला उतावीळ ग्रामस्थ आणि काही अतिउत्साहित तरुणांनी डिवचण्याचा पराक्रम केला. वाघाच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी आणि व्हिडिओ काढणे एवढेच नव्हे तर वाघाच्या दिशेने दगडसुद्धा भिरकावले. नागरिकांच्या या असंवेदनशील वागण्याची शिक्षा मात्र वाघाला भोगावी लागली. वाघाला जेरबंद करण्याचा निर्णय वन विभागाला घ्यावा लागला.

 

वाघाला जेरबंद केल्यानंतर त्याला सोडायचे कुठे ? तर उमरझरी किंवा नवेगाव अभयारण्यात सोडायचा निर्णय वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी घेतला. मात्र नवेगाव व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वाघाला नवेगावच्या जंगलात सोडण्यास असहमती दर्शवली. आता या वाघाला कुठे सोडायचे यावर विचारविनिमय सुरू असतानाच भंडारा येथील एका वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना एक फोन ‘कॉल’ आला. तो कॉल होता प्रसिद्ध अभिनेत्री आणि महाराष्ट्र वन्यजीव सद्भभावना राजदूत रविना टंडन यांचा. ‘तई मे जिस बाघ को अपने पिंजरे मे बंद किया है उसे कोका जंगल मे छोडिये’ रविना टंडन यांचे हे शब्द कानी पडताच वन अधिकारी देखील अवाक झाले.

 

रविना टंडन यांना याबद्दल माहिती कशी मिळाली असेल यावर संशोधन सुरू झाले. त्यातून एक गोष्ट लक्षात आली की तई येथे वाघाला जेरबंद केल्यानंतर एका प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकाराने एक पोस्ट समाजमाध्यमांवर केली होती आणि त्यात लिहिलं होत की ‘या वाघाला कोका जंगलात सोडण्यात यावे ‘. त्याच छायाचित्रकाराने रविना टंडन यांना फोन करून ही माहिती दिली असावी, असे कयास लावला जात आहे.

रविना टंडन यांच्या एका फोन कॉलमुळे या वाघाला कोका जंगलात सोडण्यात आले आणि त्यानंतर याच वाघाने दोन बळी घेतले. आता रविना टंडन यांना कोका जंगलाबद्दल काय माहिती आहे, कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी वन अधिकाऱ्यांना कोका जंगलात या वाघाला सोडण्यास सांगितले याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

महात्मा ज्योतिबा फुले महान समाजसुधारक

महात्मा ज्योतिबा फुले महान समाजसुधारक महात्मा फुले हे महान समाजसुधारक होते.त्याच्याच प्रयत्नातून आपल्याला आज समाजात एकता व …

न्यूज प्रसार सेवा मे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टल न्यूज आगे

न्यूज प्रसार सेवा मे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टल न्यूज आगे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *