Breaking News

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

Advertisements

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर आज शुक्रवारी महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सर्व महानगरपालिकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. राज्यभरात फिस्कटकेल्या युत्या, तयार झालेली नवी समीकरणे आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने कोणत्या शहरात कोणाचा महापौर होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisements

पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने थेट भाजपला दिलेले आव्हान, कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी लावलेली ताकद, सांगलीमध्ये विशाल पाटील, विश्वजीत कदम, जयंत पाटील यांनी एकत्रित येत दिलेला विजयाचा नारा त्यामुळे आजचा निकाल अनेकार्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निकालामध्ये महायुती राज्यात पुन्हा एकदा वरचढ चढणार की विरोधक मुसंडी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपूरमध्ये भाजपचे पारडे जड आहे. तर मुंबईत उद्धव सेना विरुद्ध भाजपमध्ये जोरदार टक्कर आहे. पुण्यात अजित पवार गट आघाडीवर असेल.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

शरद भोयर यांचे निधन

दुःखद बातमी कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की श्री. अमित भोयर यांचे वडील श्री. शरद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *