रायगड जिल्ह्यातील उरण येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी (महसूल) राहुल मुंडके यांनी बेकायदेशीरपणे वनांचे शेरे 7/12 वरून कमी केल्याचे उघडकीस आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. यात काही वनअधिकारी सहभागी असल्याचे बोलले जात आहे.
मागील वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत निवड केलेल्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांचा समावेश होता. अशा उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी नियमबाह्य काम केल्याने महसूल विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.
विश्वभारत News Website