Breaking News

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात नायब तहसीलदाराची आत्महत्या : कौटुंबिक कारण की आणखी काही?

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वानाडोंगरी येथील ग्रीन फील्ड सोसायटीमध्ये मौदा येथील नायब तहसीलदार वैभव राठोड यांनी राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. प्रशासनासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisements

 

प्राप्त माहितीनुसार, वैभव राठोड हे सध्या मौदा येथे उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी हिंगणा तहसीलमध्ये मंडल अधिकारी तसेच ब्रम्हपुरी येथेही सेवा बजावली होती. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात नायब तहसीलदार पदाचा अधिकारी आत्महत्येसारखं गंभीर पाऊल उचलत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

 

आत्महत्येचे कारण…!

 

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात असून, कुटुंबीय व संबंधितांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे शासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे अडचणीत : लाच प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे लक्ष घालणार

जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याला ५ लाखांची लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आल्याची घटना घडली …

अभय हरणे ने महानिर्मिति के उत्पादन निदेशक का पदसूत्र संभाला

अभय हरणे ने महानिर्मिति के उत्पादन निदेशक का पदसूत्र संभाला   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *