Breaking News

दूध उत्पादकांसाठी नवीन योजना आणणार : केदार

Advertisements

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकºयांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटनेचे प्रमुख तसेच राज्यभरातील विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
मंत्र्यांनी विविध सरकारी आणि खाजगी दूध संघाचे पदाधिकारी आणि दूध उत्पादकांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या जाणून घेतल्या. शासन मदतीसाठी गंभीर असून लवकरच नवीन योजना आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वैदिक सनातन हिन्दू धर्म में अक्षय तृतीया का बडा ही महत्व

वैदिक सनातन हिन्दू धर्म में अक्षय तृतीया का बडा ही महत्व टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी नागपुर। महानिर्मिती कोराडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *