वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत वर्धा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम करण्याकरीता लागणारे सर्व साहीत्य विकास भवन गांधी चौक येथील आवारात गोडावुन मध्ये ठेवलेले होते. दि.06/07/2020 रोजी सकाळी 09.00 वा फिर्यादीने गोडावुन मध्ये जावुन साहीत्याची पाहणी केली असता त्यामध्ये 100 लोखंडी शिकंजी दिसुन आले नाही. सदर 100 लोखंडी सिकंजे ज्याची अंदाजे कि.25 रू प्रती नग प्रमाणे 2500 रू चा माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याचे फिर्यादीने शहर पोलिसात लेखी रिपोर्ट दिली होती.सदर फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास हाती घेऊन सदर चोरीच्या गुन्ह्याची चौकशी केली असता आरोपी नामे -1) प्रदीप झनकलाल ठाकरे वय 24 वर्ष 2) निखील गोपींचेद मेश्राम वय 28 वर्ष दोन्ही रा.बोरगाव मेघे वर्धा यांना ताब्यात घेऊन यांच्या कडून 43 लोखंडी शिकंजे जुमला किंमत 1075 रू चा माल जप्त जप्त करण्यात आला.व सदरच्या गुन्ह्यात आरोपी विरुद्ध अप.क्र. 0714/2020 कलम 380 ,34 भादवी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री प्रंशात होळकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री पियुश जगताप ,यांचे मार्गदर्शनात श्री योगेश पारधी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे स.फौ. बाबाराव बोरकुटे,ना.पो.शी.महादेव सानप,पो.शी. गितेश देवघरे, पो.शी. विकास मुंढे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली आहे.