शरीराचे वजन कमी करण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी कोणती वेळ योग्य असू शकते? याबाबत आपण कधीही विचार केला आहे का. रात्रीचे जेवण वज्र्य केल्याने की सूर्यास्तापूर्वीच जेवण केल्यास, वजन घटण्यासाठी मदत मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
१९६०च्या दशकातील लोकप्रिय न्युटिड्ढशनिस्ट एडेल डेव्हिस यांनी सांगितलं होतं की, ‘नाश्ता राजाप्रमाणे, दुपारचे जेवण राजकुमाराप्रमाणे आणि रात्रीचे जेवणाच्या सेवन गरीबाप्रमाणे करावेङ्क. याव्यतिरिक्त आरोग्य निरोगी राहण्यासाठी काय आणि किती प्रमाण खाणं तसंच कोणत्या वेळेस खावे, हे देखील माहीत असणे आवश्यक आहे.
सकाळचा नाश्ता
न्याहारी हा आपल्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार आहे. म्हणून नाश्ता कधीही वज्र्य करू नये. हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी ४५ ते ८२ वर्षे या वयोगटातील पुरुषांच्या आरोग्यावर होणा?्या परिणामांचा अभ्यास केला. यादरम्यान त्यांना असे आढळले की सकाळचा नाश्ता करणा?्यांच्या तुलनेत जी लोक नाश्ता वज्र्य करतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येणे किंवा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका २७ टक्के अधिक प्रमाणात होता.
दुपारचे जेवण
बहुतांश लोक दुपारच्या जेवणात खाद्यपदार्थांचे अधिक सेवन करतात. कारण यावेळेस शारीरिक कार्य जास्त प्रमाणात होते. कॅलरीज जलदगतीने घटत असतात. यामुळे शरीरास पोषण तत्त्वांची आवश्यकता अधिक भासते आणि या तत्त्वांचा शरीर इंधन म्हणून वापर करते.
रात्रीचे जेवण
रात्री झोपण्यापूर्वी जेवण केल्यास शरीरातील रक्तातील शर्करा आणि इंसुलिनचे प्रमाण वाढते. यामुळे झोपेमध्ये अडथळे निर्माण होतात. ही समस्या टाळण्यासाठीच रात्रीचे जेवण हलक्या स्वरुपात असावे. तसंच झोपणे आणि जेवण्याच्या वेळेमध्ये किमान तीन तासांचं अंतर असावे. यामुळे वजन जलदगतीने घटण्यास मदत मिळते. पूर्वीची लोक रात्री आठ वाजेपर्यंत जेवण करत असत.
तसंच महत्त्वाचे म्हणजे रात्री उपाशी पोटी झोपण्याचीही चूक करू नये. हलक्या स्वरुपातील आहार करणं शरीरासाठी गरजेचं आहे.
आपण काय करावे?
रात्री झोपण्यापूर्वी जेवणे टाळावे.
रात्रीचे जेवण पचनास हलके असावे.
झोपण्यापूर्वी कमीत कमी तीन तास आधी जेवण करावे.
रात्रीचे जेवण उशिरा का करू नये?
रात्री जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.
रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे बहुतांश लोक आरोग्यास पोषक नसलेल्या पदार्थांचे सेवन करतात.
आईस्क्रीम आणि अन्य गोड पदार्थ झोपण्यापूर्वी खाल्ल्यास रक्तातील शर्करा वाढते.
शरीरास आराम देणा?्या मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होऊ शकते. यामुळे निद्रानाश होऊ शकतो.
जेवणानंतर लगेचच झोपल्यास अॅसिड रिफ्लॅक्स वाढण्याची शक्यता असते.
निरोगी आणि शरीर फिट राहण्यासाठी रात्रीचे जेवण वेळेवर करणंच आवश्यक आहे. यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते तसंच कित्येक आजारांपासूनही शरीराचे संरक्षण होते.
आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्या आहारात बदल करावेत.
Check Also
काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द
काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द टेकचंद्र सनोडिया …
जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम
जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …