चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी नविन मालिका सुरु
वर्धा, :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वतीने नविन वाहन खरेदी करण्यात आलेल्या वाहनांना क्रमांक देण्यासाठी MH32-AS (एम एच 32 ए.एस.) हि नविन मालिका सुरु करण्यात आली आहे. ज्या नविन चार चाकी वाहन खरेदी करणा-या वाहन धारकांना आकर्षक क्रमांक पाहिज असल्यास अशा नविन वाहन खरेदी केलेल्या चार चाकी वाहन धारकांनी आकर्षक क्रमांकासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी केले आहे.
विश्वभारत News Website