पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 7 जून : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे विविध  प्रकारचे  प्रशिक्षण आयोजित  करून जास्तीत जास्त नागरिकांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकरीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.

 महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 14 ते 24 जून 2021 या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे

 सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी  13 जून 2021 पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, छावणी एरिया, गडचिरोली येथे स्वतःचा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन हजर रहावे.

            अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 07172-274416, 9403078773 व कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे मो. न. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

अब सोलर पॉवर से जगमगाएंगे छात्रावास और आश्रम शालाए

अब सोलर पॉवर से जगमगाएंगे छात्रावास और आश्रम शालाएं टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

आर्थिक गुन्ह्यात तीनदा अडकलेले नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. धवनकर कसे सुटतात?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *