उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि. 12 जून: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि. 14 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजता, रविभवन, नागपुर येथून मोटारीने वरोरा जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

सकाळी 9 वाजता, शासकीय विश्रामगृह,वरोरा येथे आगमन, सकाळी 9:30 वाजता, उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 10 वाजता, उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे पत्रकार परिषद. सकाळी 10:30 वाजता वरोरा येथून मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

सकाळी 11:30 वाजता, शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. दुपारी 12 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12:30 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता, चंद्रपूर येथून मोटारीने गडचीरोलीकडे प्रयाण करतील.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *