Breaking News

विरोधी नगरसेवकांकडून ओपनस्पेस सौंदर्यकरण कामांची पाहणी.,ले-आऊट टाकून इंजिनीअर गायब, कामे रामभरोसे.

Advertisements
विरोधी नगरसेवकांकडून ओपनस्पेस सौंदर्यकरण कामांची पाहणी.
(ले-आऊट टाकून इंजिनीअर गायब, कामे रामभरोसे.)
कोरपना(ता.प्र.)
        गडचांदूर नगरपरिषद अंतर्गत शहरातील ओपनस्पेस सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतींच्या बांधकामांना नुकतीच सुरूवात झाली आहे. असे असताना मात्र शहराच्या मध्यभागी बांधण्यात आलेली नवीन पाण्याची टाकी गळती प्रकरण लक्षात घेता ओपनस्पेसची कामे तरी दर्जेदार व्हावी या उद्देशाने येथील काही सुज्ञ नागरिकांनी विरोधी पक्ष भाजप नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांना याकडे लक्ष घालण्याची विनंती केली.सततच्या विनंतीला मान देऊन अखेर ११ जून रोजी या नगरसेवकांनी भाजप शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार सह दिवसभर शहरातील समस्त ओपनस्पेस व नाली बांधकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली असता याठिकाणी मोठ्याप्रमाणात भोंगळ कारभार सुरू असल्याचे आढळून आले.
         यातील विशेष बाब म्हणजे सदर कामांचे ले-आऊट दिल्या पासून एक दिवसही नगरपरिषद इंजिनीअरने ढुंकुनही पाहिले नाही अशी माहिती स्थानिक काही नागरिकांनी यांना दिल्याचे कळते.स.नं.१०७ च्या ओपनस्पेसवर निष्कृष्ठ दर्जाची गीट्टी व इतर मटेरिअलचा वापर होत असून निव्वळ दोन ते अडीच फूट कॉलम खोदण्यात आले आणि यात सोलींग न करता काम सुरू असल्याचे दिसून आले.स.नं.१२०(विक्की उरकुडे)यांच्या घरावळील ओपनस्पेसवर अपूरे खड्डे व सोलींगसाठी निकृष्ठ दर्जाचे बोल्डरचे ढिगार पडून दिसले.त्याचप्रमाणे उरकुडे ते कादरी यांच्या घरापर्यंतच्या रोड वरील नाली बांधकामाची पाहणी केली असता त्या कामात व्हायब्रेड मशीनचा वापर होताना दिसला नाही. काँक्रिटमध्ये मातीयुक्त काळी रेतीचा वापर जास्त होत असल्याचे निर्दशनास आले.स.नं. ३६६/१ येथील ओपनस्पेसवर सुध्दा निकृष्ठ दर्जाचे मटेरिअलचा वापर करण्यात आला असून सोलिंग न करता सरळ बेड टाकल्याचे आढळून आले.ओपनस्पेस वरील अतीक्रमण न काढता जागा सोडून ले-आऊट दिले.विषेश म्हणजे या एकाही कामावर न.प.व पीएमसीचा कोणताही इंजिनीअर उपस्थितीत नव्हता. निव्वळ रामभरोसे करोडोंची कामे सुरू आहे. संबंधित ठेकेदार कामात धांदली करीत असून निकृष्ठ दर्जाचे काम होताना दिसत आहे.यामुळे न.प.चे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत पाहणीकर्ता नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.पाणी टाकीचे बांधकाम ज्याच्या देखरेखीत झाले.त्याच मेकॅनिकल इंजिनीअर(स्वप्नील पिदूरकर)कडे या कामांची जबाबदारी न.प.ने दिली आहे हे मात्र विशेष.
   नगरपरिषदकडे सिव्हिल इंजिनीअर उपलब्ध असताना शहरातील विविध प्रकारची कामे मेकॅनिकल इंजिनीअर कडेच का दिली जाते ? याविषयी अनेक शंकाकुशंका व्यक्त केली जात असून न.प.कडे इंजिनीअर असतानाही बाहेरच्या सिव्हिल इंजिनीअरकडून ले-आऊट देण्यात आल्याचे कळते.असे असताना विरोधी नगरसेवक दररोज भ्रष्टाचाराचे नवनवीन प्रकरण उघडकीस आणत आहे.आणि निष्कृठ दर्जाचे काम होत असल्याची तक्रार वरिष्ठांकडे वारंवार करीत आहे परंतु याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने विरोधी नगरसेवक पुन्हा तक्रारीचे सत्र तिव्र करणार असल्याचे चित्र आहे.
       (आम्ही शहरात होत असलेले विविध विकास कामांच्या विरोधात नसून निकृष्ट दर्जाची कामे करून जर जनतेच्या पैशांची विल्हेवाट लावली जात असेल तर हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही) अशी भावना या विरोधी नगरसेवकांनी “दै.चंद्रधून” प्रतिनिधी समोर व्यक्त केली आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *