Breaking News

बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी : महापौरासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Advertisements
बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी
महापौरासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

चंद्रपूर, ता. १८ : पारंपारिक पद्धतीने लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषणात भर पडते. त्याला आळा घालण्यासाठी बायपास मार्गावरील प्रभागात बाबुपेठ स्मशानभूमी येथे एलपीजी गॅसवर चालणारी शवदाहिनी उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली. येत्या महिनाभरात ही शवदाहिनी लोकसेवेत रुजू होईल, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.

Advertisements

यावेळी पाहिणीदरम्यान उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेवक स्वामी कनकम यांची उपस्थिती होती.  

Advertisements

शवदहनासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा लागतो. त्यासाठी जंगलतोड होत असते. शिवाय लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषण होते. एलपीजी गॅसच्या शवदहनातून वातावरणात प्रदूषण कमी होते. एलपीजी गॅसवरील शवदाहिनीमुळे कार्बनचे प्रमाण कमी होऊन झाडे ही कापण्यापासून वाचतील. त्यासाठी बाबुपेठ प्रभागातील या स्मशानभूमीत ही शवदाहिनी लावण्याचे काम सुरू आहे. आता येथे गॅस शेड, चिमणीसह एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी सांगितले. येथे सपाटीकरण व काँक्रीटपाथ बांधकाम, सौदर्यीकरण देखील करण्यात येणार आहे. स्मशानभूमीलगतच्या जागेची मोजणी करून अतिक्रमण थांबविण्याच्या सूचनादेखील महापौरांनी दिल्या. 

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *