भारतीय जैवविविधता अवार्ड -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा
चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर, ता. १८ : राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण व पर्यावरण, वन व वातावरण बदल, कार्यालय भारत सरकार, न्यु दिल्ली यांनी UNDP च्या मदतीने जैवविविधता संवर्धन व संरक्षण, जैविक संसाधनाचा शाश्वत वापर व जैविक संसाधनाचा व्यावसायिक वापर होत असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळणारा योग्य व समन्यायी लाभांश मध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती / स्वयंसेवी संस्था / शैक्षणिक संस्थेला भारतीय जैवविविधता अवार्ड ( Indian Biodiversity Award ) सन २०१२ पासून प्रदान करण्यात येत आहे. यंदाच्या भारतीय जैवविविधता अवार्ड (Indian Biodiversity Award ) -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांनी Indian Biodiversity Award २०२३ करिता संबंधित व्यक्ती / संस्थेकडून उत्कृष्ठपणे कार्य केलेल्या व्यक्तीच्या प्रवेशिका मागवलेल्या आहे. प्रत्येक वर्गवारीमध्ये ५ लाख रुपयाचे बक्षीस असून प्रोत्साहनपरसुध्दा दोन प्रवेशिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुिक व्यक्ती / संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन विशिष्ट प्रपत्रात त्यांचे प्रस्ताव ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, चेन्नई कार्यालयात परस्पर पाठवावे किंवा ३१ ऑक्टोबर २०२१ पूर्वी या कार्यालयात पाठवावे, जेणेकरुन त्यांचे प्रस्ताव या कार्यालयाकडून शिफारशीसह राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, चेन्नई यांच्याकडे मुदतीपूर्वी पाठवता येईल, अधिक माहितीसाठी इच्छुक व्यक्ती यांनी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा अधिकच्या माहितीकरिता या कार्यालयातील ईमेल msbb.ngp@gmail.com द्वारे संपर्क करावा, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली आहे.
प्रवेशिकेची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.
१. Conservation & Sustainable use of biological resource
२. Best Biodiversity Management Committees .
३. Incentivizing Access & Benefit Sharing
४. Best People’s Biodiversity Register