Breaking News

जिल्ह्यात 24 तासात 112 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

Advertisements

जिल्ह्यात 24 तासात 112 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

Advertisements

चंद्रपूर,दि. 21  जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 15 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

Advertisements

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 6, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 5, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 2, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील 1 महिला तर गोंडपिपरी तालुक्यातील 1 महिलेचा समावेश आहे.

            जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 567 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 407 झाली आहे. सध्या 642 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 37 हजार 393 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 50 हजार 635 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1518 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *