Breaking News

कोरपना,गडचांदूर येथे भाजपतर्फे “आंतरराष्ट्रीय योगदिन” साजरा.

Advertisements
कोरपना,गडचांदूर येथे भाजपतर्फे “आंतरराष्ट्रीय योगदिन” साजरा.
कोरपना(ता.प्र.):-
          महाराष्ट्राचे माजी वित्त नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार २१ जून रोजी कोरपना,गडचांदूर येथे भाजपच्या वतीने “आंतरराष्ट्रीय योगदिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गडचांदूर येथे शहर भाजपच्या वतीने येथील बालाजी सेलिब्रेशन येथे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी योग शिक्षक हलदार,किन्नाके सर,श्रीमती चंद्रभागा वरारकर यांना शाल,श्रीफळ,शिल्ड व मास्क भेट देऊन सत्कार करण्यात आला.भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांनी आपल्या प्रास्ताविकात योगाचे म्हत्व व योगदिन केव्हापासून साजरा केला जात आहे,यासंबंधी सविस्तर माहिती दिली.सतीश उपलेंचीवारांसह भाजप युवा नेते व माजी नगरसेवक निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,हरी घोरे,अरविंद कोरे,उद्धव पुरी,विनोद कावतवर,सूनील जोगी,संजय भुजाळे,प्रतीक सदनपवार,अजी़म बेग,तुषार देवकर,सुयोग कोंगरे, कुणाल पारखी,इमरान पाशा,रितीका बारसागडे,वैभव राव,माजी नगराध्यक्षा सौ.विज्यालक्ष्मी डोहे,रंजनाताई मडावी,रितीका ताजने,सौ.सपना सेलूकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.निलेश ताजने यांनी आभार व्यक्त केले.
   कोरपना भाजपच्या वतीने स्थानिक श्रीकृष्ण सभागृह येथे जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भाजप तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.योग गुरू बंडू मोहितकर सर,किशोर बावने,डॉ.भास्कर मुसळे,दिवाकर मालेकर,संजय मुसळे,रमेश पा. मालेकर,नगरसेवक अमोल आसेकर,ओम पवार,पवन मोहितकर,बालू पाणघाटे आदी मान्यवरांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. या दिनाचे औचित्य साधून नारायण हिवरकर यांच्या हस्ते योग गुरु बंडू मोहित्कर यांचा शाल, श्रीफळ,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योग गुरू दिवाकर मालेकार यांचा सत्कार करण्यात आला.योग गुरु मोहितकर सर यांनी योगाबद्दल सखोल मार्गदर्शन व योग प्रशिक्षण दिले.भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व योगाची आवड असलेल्या नागरिकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन किशोर बावणे तर आभार ओम पवार यांनी व्यक्त केले.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *