Breaking News

 व्हिडिओ निर्मिती काव्यगायन स्पर्धेचा सोहळा, कार्तिक झेंडे प्रथम तर सौ. सुनिता नाईक द्वितीय

 व्हिडिओ निर्मिती काव्यगायन स्पर्धेचा सोहळा, कार्तिक झेंडे प्रथम तर सौ. सुनिता नाईक द्वितीय
चंद्रपूर : सप्तरंग साहित्यिक समूह आयोजित दिनांक 21 जून रविवारला “काव्यगायन व्हिडिओ निर्मिती काव्य स्पर्धेचे आयोजन” करण्यात आले होते. नवकविंना व्हिडिओ वरील स्पष्टता, डेरिंग यायला पाहिजे. आजच्या ऑनलाईन आणि इंटरनेट सोशल मीडियाच्या जगात आपणही साहित्य व्यक्त करण्याची शैली बदलली गेली पाहिजे, आज-काल सर्वच क्षेत्र ऑनलाइन झाली आहेत, साध्या ऑफिसियल चर्चा, मीटिंग असो की सभा असली तरी ऑनलाइन घेतली जाते. कोरोना काळात सर्व जग आणि आपण थांबलो असताना सुद्धा साहित्यक्षेत्र थांबले नव्हते, प्रसारण करण्याची शैली बदलली. काव्य संमेलने, काव्य स्पर्धा ऑनलाईन होऊ लागल्या. व्यक्त करण्याची प्रसारण बदलत आहेत, आपणही काळानुसार बदलले पाहिजे. या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली होती.
 या दैनिक काव्य स्पर्धेचा निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अहमदनगर येथील बालकवी कार्तिक झेंडे याने प्रथम तर पुणे येथील प्रसिद्ध कवियत्री सौ. सुनिता नाईक ह्या द्वितीय तर कळमगाव जि. चंद्रपूर येथील नव कवियत्री सौ. रेश्मा बावणे ह्या तृतीय स्थानी आल्या. काव्य स्पर्धेचे परीक्षण सौ. प्रिया गावडे, ठाणे यांनी केले. सप्तरंग साहित्यिक समूहातर्फे स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आणि सहभागी कवींना सहभाग डिजिटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
नव कवी / लेखक/ साहित्यिकांच्या लिखाणाला वाव व प्रोत्साहन देण्यासाठी या समूहातर्फे दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते व आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येतो. त्यामुळे नव लेखक / कवींना लिखाणास वाव मिळत असून सप्तरंग साहित्य समूह साहित्यक्षेत्रात नावलौकिक मिळवून सन्मानास पात्र व इतर ग्रुप साठी प्रेरणादायी ठरला आहे.
समूहसंपादन व संपादक श्री विठ्ठल आवळे हे करीत असून काव्य परीक्षण सौ. भारती तिडके, गोंदिया सौ. सुनीता नाईक, पुणे, श्री. पद्माकर भावे, ठाणे. श्री. महेंद्र सोनवणे गोंदिया, सौ. मीना उपाध्ये ब्रह्मपुरी, विशाल मोहुर्ले, खुशाब लोनबले, विठ्ठलराव वठारे यांचे विशेष मार्गदर्शन व सौ. हर्षला पाटील,
पुनाजी कोटरंगे, कृष्णा नीकोडे, बाळासाहेब रोहोकले, आत्माराम शेवाळे, राजेंद्र उदारे, पवन कीन्हेकर,रेश्मा बावणे, प्रिया गावडे, कु. काजल नंदरधने, सुरेश मोटघरे, दत्ता खुळे, शिवप्रसाद घोडके, याचे विशेष सहकार्य लाभत आहेत.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *