Breaking News

प्रभाकर पाचपुते यांचे विराआंस समिती कडून अभिनंदन  , विदर्भाच्या तरुणाने स्वकर्तृत्वाने विदेशात फडकविला झेंडा देशाचा झेंडा 

Advertisements
* प्रभाकर पाचपुते यांचे विराआंस समिती कडून अभिनंदन 
* विदर्भाच्या तरुणाने स्वकर्तृत्वाने विदेशात फडकविला झेंडा देशाचा झेंडा 
चंद्रपूर, वार्ताहर  –
               विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती गावातील प्रभाकर पाचपुते या सुप्रसिद्ध कलाकाराने इंग्लंडमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा जागतिक पातळीवरील ” आर्ट्स मंडी ” हा पुरस्कार मिळवून विदर्भाचे व चंद्रपूर जिल्ह्याचे नाव रोशन करीत इंग्लंड मध्ये आपल्या देशाचा झेंडा फडकवला आहे. याबद्दल विदर्भ राज्य आंदोलन समितीने प्रभाकर पाचपुते यांचे अभिनंदन केले आहे.
             आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाविष्कारांना सन्मानित करणाऱ्या आर्ट्स मंडी या संस्थेकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इतर पाच आर्टिस्ट सोबत प्रभाकर पाचपुते यांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांनी काढलेल्या ‘ पोलिटिकल ॲनिमल ‘ या चित्र मालिकेतील चित्रांसाठी जाहीर झाला आहे. आर्ट्स मंडी या संस्थेकडून 2002 सालापासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
               प्रभाकर पाचपुते या युवकाने विद्यार्थी दशेपासून प्रचंड जिद्द, कठोर परिश्रम आणि प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर हा पुरस्कार मिळवून मनुष्य हाच आपल्या स्वतःच्या नशीबाचा कर्ता आहे, हे विपरीत परिस्थितीतही कृतीने सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या या घवघवीत व अतुलनीय यशाबद्दल त्यांचे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अध्यक्ष माजी आमदार अँड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, तज्ञ सदस्य डॉ. श्रीनिवास खांदेवाले, राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षक प्रबीरकुमार चक्रवर्ती, धनंजय धार्मिक, धर्मराज रेवतकर, मुकेश मासुरकर, सुदाम राठोड, मितीन भागवत, कपिल ईद्दे, प्रदीप धामणकर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *