औरंगाबादेत ‘स्वाइन फ्लू’चा धोका!

औरंगाबाद : शहरात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. असे असताना मात्र महापालिकेने स्वाइन फ्लूसंदर्भात चाचण्या घेतल्याच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लू व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच आहेत. याविषयी विचारणा करताच आता शनिवारपासून चाचण्या घेतल्या जातील, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. कोरोना पाठोपाठ राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार राज्य शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्क केले आहे. असे असले तरी महापालिकेला अद्याप स्वाइन फ्लूचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेने कोरोना संसर्गासंदर्भात दहा ठिकाणी चाचणी केंद्र सुरू केले आहेत.

About विश्व भारत

Check Also

औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत : चौकशी कधी?

गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे आता गडचिरोलीपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात …

मैद्यामुळे अनेक गंभीर आजार : मैद्याऐवजी कोणते पर्याय?

केक आणि ब्रेडपासून ते समोसा, वडापाव, सँण्डवीचपर्यंत अशा आपल्याला आवडणाऱ्या बहुतेक फास्ट फूडमध्ये मैदा वापरला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *