नागपूर : अकोला, बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात कपाशीच्या पिकांवर गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. आता त्या पाठोपाठ सोयाबीनची पिकेही किड रोगाच्या कचाट्यात सापडत आहे. अनेक भागात ऐन शेंगा भरण्याच्या काळातच सोयाबीनवर कीड रोगाचा हल्ला होत असल्याने पानांची अक्षरश चाळणी झाली आहे. विविध जिल्ह्यांत गुलाबी बोंडअळी आढळून आल्यानंतर सोयाबीनवर चक्रीभुंगा आढळून येत आहे. चक्रीभुंग्याचा प्रादूर्भाव वाढल्यास कीडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आतापासून शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
Check Also
जुन्नारदेव के पालाचोरई में पहली बार मोती की पैदावार का हुआ शुभारंभ
जुन्नारदेव के पालाचोरई में पहली बार मोती की पैदावार का हुआ शुभारंभ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …
छिन्दवाडा का आदिवासी किसान कमा रहा एक एकड़ में 4 लाख शुध्द मुनाफा
छिन्दवाडा का आदिवासी किसान कमा रहा एक एकड़ में 4 लाख शुध्द मुनाफा टेकचंद्र सनोडिया …