Breaking News

रेल्वेत सराफा व्यापाऱ्यास लुटले

Advertisements

नागपूर : अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधून तब्बल 52 लाखांच्या सोन्यावर चोरट्यानी हात साफ केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

Advertisements

लखविंदरसिंग (वय 49 ) यांचा अमृतसर येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे उघडकीस आली.

Advertisements

अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या बी-2 डब्यातून ते प्रवास करीत होते. त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या बॅगमध्ये दागिने असलेली छोटी बॅग होती. गाडी पहाटेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर आली. सराफा व्यापारी फलाटावर उतरल्यानंतर सर्व प्रथम त्यांनी बॅग तपासली, मात्र, बॅगमध्ये छोटी बॅग नव्हतीच. चोरांनी सुरुवातीपासूनच त्यांच्यावर पाळत ठेवली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

महिला तहसीलदाराला अटक : फेरफारसाठी मागितली लाच

वडिलांच्‍या नावे असलेल्या शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करण्‍याबाबतचा आदेश काढून देण्‍यासाठी एका खासगी व्‍यक्‍तीमार्फत लाच मागणाऱ्या …

शराबी PI ने जमकर किया हंगामा : हुआ निलंबित

शराबी PI ने जमकर किया हंगामा : हुआ निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिंदवाड़ा। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *