औरंगाबाद : कोणतीही सूचना व सुनावणीची नोटीस न देताच शेतातून बेकायदेशीर रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने सोयगाव तहसील कार्यालयात कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच पोलीस पोहचले.गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव)असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध महिलेचे नाव आहे.
प्रकरण असे…
पळाशी शिवारात या महिलेचे गट क्र-२९७ एक हेक्टर शेती आहे, याच शिवारातून गट क्र-२९५ आणि २९६ कडे जाण्यासाठी व येण्यासाठी गैरअर्जदार आणि प्रतिवादी इतर दोन विरुद्ध चार अशा एकूण सहा शेतकऱ्यांना नोटिस देण्यात आल्या होत्या. मात्र, चंद्रकलाबाई शिंदे यांना रस्त्याच्या सुनावणीसाठी कोणतीही नोटीस अथवा पूर्वकल्पना तहसील कार्यालयाने दिली नव्हती. आपल्याच शेतातून अर्थात गट क्र-२९७ मधून रस्ता दिल्याची माहिती महिलेला मिळाली होती. त्यामुळे या महिलेने पळाशीवरून थेट सोयगाव तहसील गाठून हातात चक्क विषारी कीटकनाशकाची बाटली घेऊन नायब तहसीलदारांचे दालन गाठले. आणि माझ्या शेतातून नियमबाह्य रस्ता कोणत्या आधारावर दिला याचा जाब विचारला.
मंडळ अधिकारी, तलाठयाने केला खोटा पंचनामा
बनोटी मंडळ अधिकारी, तलाठी यांनी खोटा पंचनामा केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
विश्वभारत News Website