Breaking News

कांदा दसरा-दिवाळीत रडवणार… वाचा सविस्तर

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
कांद्याचे दर काही महिन्यापासून स्थिर असून, वाढत्या मागणीमुळे महिनाभरात कांदा दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. दसरा-दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत होऊ शकतात. सध्या किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार २० ते ३० रुपये किलो आहेत.

Advertisements

मागणी आणि पाऊस 

Advertisements

महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण आणि उत्तर भारतातून मागणी असते. कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे पीक नोव्हेंबपर्यंत येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यात कांद्याची लागवड चांगली होते. मात्र, प्रतवारीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील कांद्याचा दर्जा परराज्यातील कांद्याच्या तुलनेत चांगला असतो. दसरा-दिवाळी या कालावधीत कांद्याला मागणी वाढते. महिनाभरात परराज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचतील, असे कांदा व्यापारी सांगतात.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, जामखेड, संगमनेतर भागातून ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ८० ते १३० रुपये दर मिळाले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला १८० ते २०० रुपये दर मिळाले होते. राज्यात कांदा लागवड चांगली झाली आहे.

कारण…निर्यातीत घट

कांदा निर्यातीत घट झाली आहे. दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यातून सध्या महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. पावसाळी आणि थंड वातावरणामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे सध्या वखारीत साठवणूक केलेला कांदा शेतकरी मोठय़ा प्रमाणावर विक्रीस पाठवत आहेत. बांगलादेश तसेच आखाती देशात होणारी कांद्याची निर्यात कमी प्रमाणावर होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात गारपीटीसह पावसाचा तांडव : आणखी दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. …

भारताचे सध्याचे कृषी मंत्री कोण? शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का?

कृषीप्रधान देश म्हणून भारताचा जगात नावलौकीक आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *