विश्व भारत ऑनलाईन:
नागपुरातील कामठी मार्गावरील गड्डीगोदाम भागात असलेल्या सेंट जॉन शाळेच्या समोर महानगरपालिकेने गडरलाईनचे नवे काम सुरु केले होते. मात्र, हे काम महानगरपालिकेने अर्धवट सोडले. त्यामुळे गडरचे दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर पसरत आहे.
परिणामी, शाळेतील हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. यातून डेंगूचे डास तयार होत आहे.मागील महिनाभरापासून ही समस्या जैसे-थे आहे. याकडे महानगपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. गडरचे झाकन खुले असल्याने येथे अपघात होऊन विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकते. यावर तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे पश्चिम नागपूरचे वार्ड अध्यक्ष विजय राजन गौरे यांनी महापालिकेच्या मंगळवारी झोनच्या(झोन क्र.10)सहायक आयुक्ताकडे निवेदन देऊन केली.