Breaking News

चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला.. कुठे घडली घटना?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर चारमध्ये घरात खेळणा-या एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्राची पंढरी नन्नावरे(वय 4)ही चिमुकली किरकोळ जखमी झाली.

Advertisements

ताडोबा लगतच्या आयुध निर्माणी वसाहत परिसरातील जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. येथील हिंस्त्र वन्यप्राणी आता घराच्या दारावर पोहोचून हल्ला करीत असल्याने वसाहतीत दहशतीचे वातावरण आहे.

या वसाहतीत यापूर्वी वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे तर काही जखमी झाले आहेत. परिसरात वाघाच्या मृत्यूच्या घटनाही समोर आल्या आहेत. मंगळवारी आयुध निर्माणीच्या सेक्टर चारमधील सदनिका क्रमांक ४२ बी मध्ये प्राची सायंकाळच्या सुमारास खेळत होती. दरम्यान, बिबट्याने घरात शिरून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने ती वाचली. परंतु तिच्या पायाला जखम झाली असून प्राथमिक उपचारानंतर ती घरी परतली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार …

नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!

हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *