Breaking News

पोलिसांसाठी खुशखबर : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

विश्व भारत ऑनलाईन :

नेहमी कामात व्यस्त असणाऱ्या पोलिसांनाही सणांचा आनंद घेता यावा, यासाठी एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पोलिसांना गिफ्ट दिलंय. पोलिसांच्या सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आता किती असणार सुट्ट्या?

आता महाराष्ट्र पोलिसांना एकूण 20 सुट्ट्या मिळणार आहे. याआधी वर्षभरात पोलिसांना केवळ 12 सुट्ट्या मिळत होत्या. राज्य सरकारने पोलिसांना आणखी आठ सुट्ट्या वाढवून दिल्या आहेत.

वर्दीत नाचु नका

नुकताच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांसाठी आणखी एक निर्णय जाहीर करण्यात आला होता. यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी पोलिसांचे नाचतानाचे व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओवरुन बरीच चर्चा देखील सुरु होती. त्यानंतर अखेर पोलीस महासंचालकांकडून याची गंभीर दखल घेण्यात आलीय.

About विश्व भारत

Check Also

स्थानीय निकाय चुनाव में कौन किसके साथ? CM देवेन्द्र फडणवीस का बयान

स्थानीय निकाय चुनाव में कौन किसके साथ? CM देवेन्द्र फडणवीस का बयान टेकचंद्र शास्त्री: 9130558008 …

4 नवंबर से 4 दिसंबर तक होगा घर-घर गणना प्रपत्र का वितरण-संकलन

4 नवंबर से 4 दिसंबर तक होगा घर-घर गणना प्रपत्र का वितरण-संकलन टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *