Breaking News

नागपुरात मिहानमध्ये टाटा करणार गुंतवणूक : गडकरी, फडणवीस प्रयत्नशील

Advertisements

राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याच्या आरोप सध्या होत आहे. या सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. तसेच विदर्भात उद्योग प्रकल्प यावेत, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहेत.

Advertisements

गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगत त्यांचे लक्ष वेधले होते. टाटा सन्सच्या विस्तारासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा ‘मिहान’मध्ये उपलब्ध आहेत. महामार्ग, रेल्वे तसेच विमानसेवा अशी दळणवळणाची भक्कम सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समूहातर्फे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्री, व्होल्टास लिमिटेड, असे विविध प्रकल्प ‘मिहान’मध्ये उभारले जाऊ शकतात, असे गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून या समूहाच्या निदर्शनास आणून दिले होते.

Advertisements

या पार्श्वभूमीवर नटराजन यांनी गडकरी यांना पत्र पाठवले आहे. ‘मिहान’मध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) ने एक आराखडा तयार केला आहे. लवकरच आमची टीम नागपूर येथे येऊन मिहान येधील उद्योग विस्ताराच्या संदर्भात सर्वेक्षण करेल, असे पत्रात सांगितले आहे. टाटा समूहाचा मिहानमधील प्रस्तावित एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत असताना नागपूरसाठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

PM मोदींचा नागपुरात मुक्काम, तळेगावात सभा : नागपूर, रामटेकमध्ये आज मतदान

१९ एप्रिलला राज्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. यात नागपूरचा समावेश आहे. आणि त्याच दिवशी …

महाराष्ट्र में मायावती को बड़ा झटका, एकनाथ शिंदे गुट की शिवसेना में शामिल हुए BSP के दो बड़े नेता

महाराष्ट्र में मायावती को बड़ा झटका, एकनाथ शिंदे गुट की शिवसेना में शामिल हुए BSP …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *