दम देऊन बोलत असतील, तर घरात घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. जशास तसे उत्तर देईल. ते ज्या स्तरावर म्हणतील, त्या स्तरावर उत्तर देईन, असा इशारा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी बुधवारी बच्चू कडू यांना दिला. ते अमरावतीत बोलत होते.
बच्चू कडू आणि माझा वाद सीएम, डेप्टी सीएम मिटवला. मी स्वःतही तो वाद मिटवला. मात्र, कुणी मला जर दम देत असेल, तर मी गप्प बसणार नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही. बच्चू कडू तर छोटा विषय आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. तर मी कुठे यायचे ते रवी राणांनी सांगावे. मी मार खायला तयार आहे, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
वाद पुन्हा उफाळला
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद शमला, असे चित्र असतानाच पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. प्रहार संघटनेच्या मेळाव्यात बच्चू कडू यांनी पहिली वेळ होती म्हणून माफ केले. पुढच्या वेळी प्रहारचा वार काय असेल ते दाखवेल, असा इशारा रवी राणा यांना त्यांनी दिला होता. त्यावरून पुन्हा दोघांतील वादात भर पडली आहे. त्यावरच रवी राणा यांनी बच्चू कडूंना इशारा दिला आहे.
बच्चू कडू काय म्हणाले
आमदार रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी कुठे यायचे ते रवी राणांनी सांगावे. मी मार खायला तयार आहे. काल मी माझी भूमिका जाहीर केली. त्यात रवी राणांचे नाव घेऊन एकही शब्द बोललो नाही. ते जर आपल्या अंगावर घेऊन बोलत असतील, तर त्याला मी काही करू शकत नाही, अशा शब्दांत कडू यांनी रवी राणांना उत्तर दिले.