Breaking News

नागपूर विद्यापीठात खळबळ! लैंगिक छळ आणि १६ लाख

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक खळबळजनक व धक्कादायक प्रकार समोर आले आहे. नागपूर विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार आली असल्याचे बोलून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 16 लाख रुपये घेतल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली.

काय आहे प्रकरण?

प्राध्यापकांच्या तक्रारीनुसार,विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी डॉ. धर्मेश धावणकर यांनी लोकप्रशासन विभागाचे प्रमुख जितेंद्र वासनिक, प्रवास पर्यटन विभागाचे प्रभारी डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बोरकर, ग्रंथालय शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सत्यप्रकाश निकोसे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सत्यप्रकाश इंदूरवाडे, जीवनरसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ.वीरेंद्र मेश्राम, मराठी विभागाचे डॉ. शैलेंद्र लेंडे यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे.

तुमच्या विरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारीमधून तुम्हाला बाहेर निघायचं असेल, तर पैसे द्यावे लागतील, अशी धमकी दिली. या प्राध्यापकांकडून सोळा लाख रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.

पोलिसात लवकरच तक्रार

प्राध्यापकांनी या प्रकरणी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी तक्रार पोलिसात दाखल करणार असल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात आले.धर्मेश धवनकर यांनी सात प्राध्यापकांना सांगितलं की, ‘तुमच्या विरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यासाठी नागपूर विद्यापीठाने चौकशी समिती गठित केली आहे. त्याचौकशी समितीमध्ये ज्येष्ठ वकील आणि माझा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्हाला या लैंगिक छळाच्या चौकशीमधून बाहेर पडायचं असेल, तर पैसे खर्च करावे लागतील.’धर्मेश धवनकरांनी पैशांची मागणी केल्यानंतर या प्राध्यापकांपैकी काहीजणांनी पाच लाख, तर काही जणांनी तीन लाख रुपये दिले. एकूण सात प्राध्यापकांकडून 16 लाख रुपये धवनकर यांनी खंडणी स्वरूपात वसूल केल्याचा आरोप आहे.

About विश्व भारत

Check Also

शिक्षक भर्ती घोटाले में मंत्री गिरफ्तार

शिक्षक भर्ती घोटाले में मंत्री गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   कोलकाता। पश्चिम बंगाल …

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *