Breaking News

राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार : एप्रिल-मे मध्ये नियुक्ती

राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त एक हजार 12 आणि नव्याने निर्माण केलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी सद्य:स्थिती आहे. परिणामी गावातील कामांवर, लोकांना मिळणार्‍या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्यावतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. त्याला आता मुहूर्त मिळत आहे.

विभागनिहाय भरती

नाशिक विभागात 1035, औरंगाबाद विभागात 847, कोकण विभागात 731, नागपूर विभागात 580, अमरावती विभागात 183 तर पुणे विभागात 746 अशा एकूण 4122 पदांची भरती लवकरच सुरू होईल.कार्यवाही महसूल विभाकडून सुरू करण्यात आली आहे.प्रत्येक विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास शासनाने सूचित केले आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचा तपशीलही जिल्हानिहाय मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता सुशिक्षित तरुणांना नोकरीची संधी मिळेल.

About विश्व भारत

Check Also

शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजितदादा की रात देर 3 बजे तक बैठक में लंबी चर्चा

शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजितदादा की रात देर 3 बजे तक बैठक में लंबी चर्चा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

राज्यपाल उद्या भंडारा, गोंदियाच्या दौऱ्यावर

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *