Breaking News

20 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ताब्यात

Advertisements

पुण्यातील पवन मावळ भागातील शिवणे येथील महिला मंडल अधिकार्‍यासह एका सहकार्‍यास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर व खासगी व्यक्ती संभाजी लोहोर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Advertisements

प्रकरण काय आहे?

Advertisements

यातील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या भडवली येथील जमिनीच्या 7 /12 उतार्‍यावर त्यांचे नाव लावण्याकरिता मंडल अधिकारी संगीता शेरकर व संभाजी लोहोर यांनी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांनी शुक्रवारी (दि.2) पडताळणी करून मंगळवारी (दि.6) 20 हजार रुपयांची लाच मंडल अधिकारी संगीता शेरकर यांनी आढले बुद्रुक तलाठी कार्यालय तालुका मावळ येथे स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जमीन विवाद में ट्रिपल मर्डर : पत्नी और दो मासूम बच्चों की गला दबाकर हत्या

जमीन विवाद में ट्रिपल मर्डर, पत्नी और दो मासूम बच्चों की गला दबाकर हत्या   …

नागपुरात नाचताना धक्का लागल्याने खून : प्रेम प्रकरण

प्रेम प्रकरणातून संतापलेल्या तिघांनी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करत अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *