Breaking News

भ्रष्टाचारी उमेदवार मत मागायला आल्यास अपमान करू

Advertisements

बारामती तालुक्यातील वाघळवाडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश किसनराव यादव यांनी या निवडणुकीत स्वतःच्या घरावर एक बॅनर लावलाय.

Advertisements

तो बॅनर तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. समाजकंटक, भ्रष्टाचारी व भ्रष्टाचाराला अभय देणारा उमेदवार मत मागायला आल्यास अपमान केला जाईल, अशा आशयाचे बॅनर लावले आहे.

Advertisements

यादव यांच्या घरात पाच मते आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. वाघळवाडी गाव राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असते. बॅनरमुळे यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. त्याची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संचालकपदाला डावलण्यात आल्याने निरा- बारामती या राज्य मार्गावर केळीचे चित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते. याची चर्चा जिल्हाभर झाली होती.

आता पुन्हा एका माजी सदस्याने आपल्या घरावर बॅनर लावल्याने वाघळवाडी गाव पुन्हा चर्चेत आले आहे. तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी 13 तर सदस्यपदासाठी 61 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननीमध्ये एका सदस्यपदाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असून 60 उमेदवार सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत. अर्ज माघारीनंतर तालुक्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

CM एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे को बड़ी चेतावनी, ‘अगर मै बोलूंगा तो…’

सीएम एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे को बड़ी चेतावनी, ‘अगर मै बोलूंगा तो…’ टेकचंद्र सनोडिया …

गांधी परिवार की वो राजनैतिक सुरक्षित अमेठी लोकसभा सीट? पिता और बेटे की जोड़ी ने किया था कमाल

गांधी परिवार की वो राजनैतिक सुरक्षित अमेठी लोकसभा सीट? पिता और बेटे की जोड़ी ने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *