Breaking News

लॅपटॉप, मोबाईलने डोळे दुखतात का? ‘हे’ सोपे उपाय करा

Advertisements

दिवसभर सर्व काम लॅपटॉप आणि मोबाईलवर सुरू असते. त्यामुळे सतत स्क्रीनच्या संपर्कात असल्याने डोळ्यांना थकवा जाणवू शकतो. यामुळे डोळे लाल होणे, डोळयांना खाज येणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे सुजणे, अस्पष्ट दिसणे अशा समस्या येऊ शकतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि डोळ्यांचा थकवा दुर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय मदत करू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या…

Advertisements

उपाय…

Advertisements

✳️काकडी
काकडीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. यासाठी मध्यम आकाराची काकडी १५ ते २० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर काकडीचे जाड काप कापून डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांना जाणवणारा थकवा कमी होऊन, डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत होईल.

✳️व्यायाम
डोळ्यांना थकवा आल्याने जास्त त्रास होत असेल तर तुम्ही नियमित डोळ्यांचे व्यायाम करणे गरजेचे आहे. डोळ्यांचे व्यायाम करणे डोळ्यांच्या आरोग्यासह लक्ष केंद्रित करण्यासही मदत करते.

✳️बर्फ
बर्फ एका कापडात गुंडाळून डोळ्यांवर लावा, यामुळे डोळ्यांना येणारी सुज, थकवा यापासून सुटका मिळण्यास मदत होईल.

✳️दूध
दुधाने डोळ्यांचा थकवा दुर करण्यास मदत मिळते. थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर लावा. हे लावताना डोळ्यांच्या आजूबाजूला मसाज करण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल आणि डोळ्यांचा थकवा दुर होईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर होने लगेगा!

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *