Breaking News

विनंती बदल्यांसाठी १७० पोलीस अधिकाऱ्यांचे अर्ज : काय होणार?

Advertisements

पोलीस निरीक्षक यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अन्य जिल्हयात बदल्या झाल्या तर काहींना बढत्या मिळाल्या. परंतु, वैद्यकिय, कौटुंबिक व इतर कारणाकरिता विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या राज्यभरातील पोलीस निरीक्षक ते उपनिरीक्षक यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे विनंती बदल्यांना मुहूर्त कधी मिळणार अशी विचारणा होत आहे.

Advertisements

पोलीस महासंचालक कार्यालयाकडे राज्यभरातील सुमारे १७० पोलीस अधिकऱ्यांनी विनंती बदल्यांची मागणी केली असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे. कार्यकाळ पूर्ण झालेले पोलीस अधीक्षक-उपायुक्त दर्जासह पोलीस निरीक्षक यांच्या आतापर्यंत बदल्या झाल्या. त्यामुळे इतर पोलीस अधिकारी हे विनंती बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

Advertisements

१७० पोलीस अधिकऱ्यांचे अर्ज

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात राज्यातील सर्वच वरिष्ठ पो- लीस अधिकारी पासून ते पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या रखडल्या होत्या. कार्यकाळ पूर्ण होऊनही अनेक अधिकाऱ्यांना त्याठिकाणी काम करावे लागत होते. मात्र; कोरोना निर्बंध उठवल्यामुळे एप्रिल- मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. जूननंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे बदल्या रखडल्या.दरवर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात बदल्या होतात. कोरोना काळ आणि राज्यातील सत्तांतर व गणेशोत्सव, नवरात्रौत्सवानंतर या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला वेग आला. ७ नोव्हेंबरला कार्यकाळ पूर्ण झालेले पोलीस अधीक्षक, पो- लीस उपायुक्तांच्या तर ९ डिसेंबरला २२५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३२ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील ३३५ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर ८४ उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात ३२ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदोन्नती देण्यात आली. पण त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

1 रुपयांचेच वेतन घेतो IAS अधिकारी : वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे …

वनकर्मचारी निलंबित : ‘ईव्हीएम’चे व्हाट्सअप स्टेटस भोवले

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *