लग्न सोहळ्यात जवळच्या व्यक्तीला त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून देत असतो. त्यामध्ये कधी मोबाईल, घड्याळ अशा वस्तूंचा तर कधी मांजर कुत्र्यांसारख्या प्राण्यांचाही समावेश असतो. मात्र, सध्या एकाने आपल्या बायकोला लग्नामध्ये भेट म्हणून चक्क गाढव दिल्याची घटना घडली आहे.
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य़ाचा धक्का बसला असेल पण ही खरी घटना असून ती पाकिस्तानात घडली आहे. पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध युट्यूबरने त्याच्या बायकोला गाढवचं पिल्लू भेट म्हणून दिलं असून सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
अजलानने आपण पत्नीला गिफ्ट म्हणून गाढवाचं पिल्लू का दिलं याचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला, ‘मला माहित होतं की वारीशाला गाढवांची पिल्लं खूप आवडतात, म्हणून मी तिला ते गिफ्ट म्हणनू दिलं.’ तर अजलानची पत्नी वारीशाने सांगितलं की, ‘मी या गाढवाला फक्त गाढव नाही राहू देणार.’ दरमम्या, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये या दोघा नवविवाहीत पती-पत्नीने ‘एक मैं और एक तू, दोनो मिले इस तरह…’ आणि ‘मेरे मेहबूब मेरे सनम, अशा अनेक बॉलिवूड गाण्यांवर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
गाढवाच्या पिल्लाला त्याच्या आईपासून वेगळे केलेलं नाही. तो त्याच्या आईला देखील बरोबर घेऊन आला आहे. त्यांनी गाढवाचं पिल्लू आणि त्याच्या आईला ३० हजार रुपयांमध्ये विकत घेतलं आहे. शिवाय या दोघांनाही आता कष्टाची कामं करावी लागणार नाहीत. बीबीसीशी संवाद साधताना अजलानने सांगितले की, माझ्याप्रमाणे वारीशाही प्राणीप्रेमी असून मी तिला हे सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. लोक या गिफ्टबद्दल काय विचार करतात याचं मला काही देणं घेणं नाही, असेही सांगितले.
विश्वभारत News Website