Breaking News

महावितरणचे दोन अभियंते लाचलूचपतच्या जाळ्यात

Advertisements

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केलीय. पालघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात महावितरण कंपनीच्या पालघरच्या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यास अटक करण्यात आली. संबंधित अभियंत्यांनी तक्रारदार व्यक्तीच्या वीज वापरात अनियमितता असल्याने कारवाई टाळण्यासाठी दोन लाखांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी नंतर एक लाख रुपये स्वीकारताना कार्यकारी अभियंता प्रताप मचिये आणि अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांना रंगेहाथ पकडले.

Advertisements

तक्रारदाराच्या वीज वापरात अनियमितता असल्याच्या तक्रारी महावितरण कंपनीच्या पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. कारवाई टाळण्यासाठी किरण नागावकर यांना दोन लाख रुपये द्यावे लागतील, असा निरोप महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांनी तक्रारदाराला दिला होता. यानंतर महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडून लाचेची मागणी केली जात असल्याची तक्रार पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता प्रताप मचिये यांनी तक्रारदारासोबत तडजोडी करुन दीड लाख रुपयांची मागणी केली आणि किरण नागावकर यांनी सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचेचा सापळा रचण्यात आला होता.

Advertisements

सोमवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दीड लाख रुपयांपैकी एक लाख रुपये रकमेचा पहिला हप्ता प्रताप मचिये यांना स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचेची मागणी आणि लाचेची रक्कम स्वीकारण्यात किरण नागावकर यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने किरण नागावकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

ट्रेनों मे चोरी करने वाला सातिर गिरोह रेलवे पुलिस की गिरफ्त में

ट्रेनों मे चोरी करने वाला सातिर गिरोह रेलवे पुलिस की गिरफ्त मे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

सडक हादसे में पांच लोगों की मौत: 6 घायल, 2 की हालत नाजुक

सडक हादसे में पांच लोगों की मौत: 6 घायल, 2 की हालत नाजुक टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *