Breaking News

… तर सत्तार यांच्यावर कारवाई : मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत

Advertisements

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस बजावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती घेत असून योग्य निर्णय घेऊ, असे नागपुरात सांगितले.

Advertisements

काय आहे प्रकरण?

Advertisements

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध वाटप केल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला होता.

अब्दुल सत्तार यांनी सत्तांतराच्या अगोदर म्हणजे शिवसेनेतल्या फुटीच्या तोंडावर 17 जून 2022 रोजी ३७ एकर गायरान जमीन योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना कोणत्याही कायदेशीर बाबींचे पालन केले गेले नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

नागपूर खंडपीठात या प्रकरणात सुनावणी झाली. यावर हायकोर्टाने अब्दुल सत्तार यांच्यावर कडक शब्दात ताशेते ओढलेत. अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहीत असूनही सत्तारांनी हा निर्णय घेतलाय. जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या जीआरची ही सत्तारांच्या निर्णयामुळे या पायमल्ली झाली आहे, असं म्हणत कोर्टाने सत्तार यांना नोटीस धाडली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *