प्रसिद्ध व दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा 12 वर्षांनंतर पुन्हा कॅन्सरच्या विळख्यात सापडली आहे. तिला दुहेरी फटका बसला आहे. अर्थात नवरातिलोव्हाला आता स्तन आणि घश्याचा कर्करोग झाला आहे. 66 वर्षीय या टेनिसपटूला 2010 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने सहा महिन्यांत स्टेज कॅन्सरवर मात केली होती.
18 वेळची ग्रँडस्लॅम एकेरी चॅम्पियन मार्टिना नवरातिलोव्हाला दुहेरी कॅन्सरमुळे धक्का बसलाय. ती म्हणाली, हा दुहेरी धक्का गंभीर आहे. परंतु नक्की तो बरा होईल. मी अनुकूल निकालाची वाट पाहात आहे. नवरातिलोव्हाला फोर्ट वर्थ टेक्सास येथे नोव्हेंबरमध्ये घशाचा त्रास जाणवला. यानंतर तिची बायोप्सी करण्यात आली, त्यामध्ये घशाच्या कर्करोगाची माहिती मिळाली. चाचणीदरम्यान तिलाही ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले. आता तिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कॉमेंट्री करता येणार नाही. ही स्पर्धा तिला दुरूनच पाहावी लागणार असल्याने ती दुःखी झाली आहे.