Breaking News

‘जलसंपदा’चे अभियंता गोडसे यांना निलंबित करा : कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण

Advertisements

औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेस. या कामासाठी निविदा काढल्या मात्र वृक्षारोपण कागदावर दाखवून मलाई खाण्यात आली. इतकेच नाही तर एकाच खड्यात दोन झाडे लावण्याचा पराक्रमही गोडसे यांनी केला.

Advertisements

यासाठी सर्वस्व जलसंपदा औरंगाबादचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत, असा आरोप आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून बदली करावी. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असून कोट्यवधीची माया स्वतःच्या घशात ओतण्याचे काम केले जात आहे. सध्या, गोडसे यांची चौकशी सुरु आहे. तरीही, ती चौकशी मॅनेज करण्याचे काम सुरु असल्याचे कळते.

Advertisements

तरी गोडसे यांच्यावर निलंबन कारवाई करून तातडीने अन्य जिल्ह्यात बदली करावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभा राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर लोकसभा निवडणुकीतील मतदान कमी झाल्याचा मुद्दा नागपूर हायकोर्टात!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील, असा दावा भाजपतर्फे केला जात …

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर कुणावर करणार कारवाई : नागपुरात मतदान कमी होण्यासाठी जबाबदार कोण?

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबद्दल सार्वत्रिक ओरड होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *