चंद्रपूरच्या मुल तालुक्यातील जंगलव्याप्त गावामध्ये वाघांनी धुकाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव वाघाच्या हल्ल्यात गेले आहेत. वनविभाग वाघांच्या बंदोबस्तासाठी अपयशी ठरल्याने वाघांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वात बुधवारी सकाळी राज्य शासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोघा व्यक्तींनी वाघांची वेशभूषा धारण करून जंगलभागातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाला साकडे घातले.
या गावातील नागरिक सहभागी👇
मुल तालुक्यातील दहेगाव, कांतापेठ, चिरोली, कावडपेठ, उथळपेठ आदी गावे बफर झोन व एफडीसीएम क्षेत्राला लागून असल्याने वाघ बिबटे, अस्वल या हिस्त्र वन्यजीवांपासून नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. कांतापेठ येथे एकाच गावातून दोघांचा बळी गेला आहे. तसेच लगतच्या गावातूनही वाघाच्या हल्यात मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी वारंवार वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतरही उपाययोजना करण्यात आले नाही, असा आरोप होत आहे. त्यामुळे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.