Breaking News

“जुनी पेन्शन वाढविणार भाजपचे टेन्शन”

Advertisements

जुनी पेन्शन न दिल्यास भाजपचे टेन्शन वाढू शकते, असे आजच्या पदवीधर शिक्षक निवडणूकीवरून दिसून आले. तसेच जेव्हा टीम म्हणून काम करतो, तेव्हा निकाल आपल्या बाजूनेच लागतात, असे मत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी आणि नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर अडबाले यांनी मिळवलेल्या विजयाने आमचे टीम वर्क स्पष्ट झाले आहे, असेही केदार म्हणाले आहेत.

Advertisements

सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी सर्वात आधी अडबाले यांना पाठिंबा दिला होता. तर यानंतर मविआने शिवसेना उमेदवार गंगाधर नाकाडे यांना माघार घेण्यास लावत पाठिंबा दिला होता.

Advertisements

महाविकास आघाडीच्या एकोप्याचा आज विजय झाला. हा एकोपा कायमस्वरुपी राहणार आहे. २०२४ मध्ये आणखी मोठे धक्के आमच्या विरोधी पक्षाला बसणार आहेत. कोण हरणार, हे आजच सांगू शकत नाही. पण आम्ही विजयी होणार हे निश्‍चित असल्याचा दावा माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी केला.

डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व एकत्र राहिलो. आम्ही पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारांचे आहोत. सर्वच्या सर्व 34 संघटनांना आम्ही एकत्रित केले. त्यांच्यात एकमत घडवून आणले. सुधाकर अडबालेंना उमेदवारी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे भूमिका मांडली. शिक्षक मतदारसंघ हा संघटनांचा मतदारसंघ आहे, राजकीय नाही, हे आम्ही काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आणून दिले. आमदार सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी यांनी ते मान्य केले. आज त्याचा परिणाम दिसत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *