सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवार, रात्री 7 वाजताच्या सुमारास मुबंईत निधन झाले. त्यांनी पीडब्लूडीच्या विविध विभागात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने प्रशासकीय वर्तुळात शोक पसरला आहे. त्यांच्या पार्थिवावर नागपुरातील मोक्षधाम घाटावर गुरुवार, दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
