Breaking News

महिला पुरवठा अधिकारी लाच घेताना अटकेत

पाच हजार रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. गुरुवारी दुपारी साडेपाच वाजता दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

स्नेहल राजेंद्र देशमुख (वय 36) असे या पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. आर्णी तालुक्यातील तळणी येथील रास्तभाव दुकानदाराला अंत्योदयमधील कमिशनचे बिल काढण्यासाठी पाच हजाराची लाच मागितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून गुरुवारी साडेपाच वाजताच्या दरम्यान यशस्वी सापळा रचून पुरवठा निरक्षकाला त्याच्या कक्षात रंगेहाथ पाच हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. त्यात प्रदीप भगत खासगी इसम व दुसरा दर्शन अनिल जगताप यांच्या माध्यमातून तडजोडीअंती पाच हजार रुपयासह पुरवठा निरीक्षक यांना ताब्यात घेण्यात आले.या घटनेनंतर आरोपींना तहसील कार्यालयातून विश्रामगृहात स्थानबद्ध करून चौकशी सुरू करण्यात आली.

About विश्व भारत

Check Also

सैकडों महिलाओं का सुहाग उजाडने वाला दाऊद इब्राहिम पाकिस्तान में!

सैकडों महिलाओं का सुहाग उजाडने वाला दाऊद इब्राहिम पाकिस्तान में! टेकचंद्र सनोडिया शास्त्रा: सह-संपादक रिपोर्ट …

जमीन जायदाद के विवाद में किसान की मौत

जमीन जायदाद के विवाद में किसान की मौत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिंदवाड़ा।09.05.2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *