Breaking News

अवघ्या 15 दिवसात मोडले महिला अधिकाऱ्याचे लग्न : हुंड्यासाठी न्यूझीलंडमधून पतीने दिला त्रास

Advertisements

आयुष्य जगताना अडीअडचणी येतात. त्यावर कौशल्यपूर्वक मात केल्यास बाहेर पडता येते. अशीच प्रचिती एका महिला अधिकाऱ्यासोबत घडली आहे. तिने कशोशीने प्रयत्न करून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Advertisements

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कोमल गणात्रा यांची ही गोष्ट. त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आल्या. पण त्यांनी त्याच्यावर धैर्याने मात केली. त्यांची जीवनकहाणी अडचणींनी भरलेली आहे. कोमल यांचा पती लग्नाच्या 15 दिवसांनंतरच त्यांना सोडून गेला. मात्र, या धक्क्यानंतरही त्यांनी हार न मानता यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आपले जीवन यशस्वी करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.

Advertisements

प्रेरणादायी…

गुजरातमधील प्रत्येक मुलाला आयआरएस कोमल गणात्रा आणि त्यांचा संघर्ष माहिती आहे. कोमल गणात्रा यांचा जन्म 1982 मध्ये गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला गावात झाला. लहानपणापासूनच कोमल अभ्यासात हुशार होत्या. त्यांच्या आयुष्यातील एका घटनेने त्यांचा स्वाभिमान दुखावला. मात्र, पराभूत किंवा कमकुवत होण्याऐवजी त्यांनी कठोर परिश्रमाने यूपीएससी उत्तीर्ण केली.

कोमल गणात्रा यांनी तीन भाषांमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे शालेय शिक्षण गुजराती माध्यमातुन झाले. बारावीनंतर त्यांनी विविध विद्यापीठांतून आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गुजराती साहित्यातही त्या टॉपर आहेत. त्यांनी राजकोट गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतला आहे. यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी आणि खासगी संस्थेतून प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्रही घेतले आहे.

2008 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी कोमलचे लग्न न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या शैलेशसोबत झाले होते. लग्नाच्या अवघ्या 15 दिवसांत त्यांचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. शैलेशने न्यूझीलंडला जाऊन कोमलशी संपर्क तोडला. त्यानंतर कोमल आपल्या माहेरी परतल्या. मात्र, परिसरातील लोक आणि नातेवाइकांच्या टोमणेबाजीने दु:खी होऊन त्या तेथूनही निघून गेल्या. तोपर्यंत त्यांना सरकारी शिक्षकाची नोकरी मिळाली होती. त्यांच्या जिद्दीला सलामच!

Advertisements

About विश्व भारत

Check Also

साल 2024 में 12 महीने की 12 बड़ी भविष्यवाणी?जनवरी से दिसंबर तक हो सकती हैं ये बड़ी घटनाएं

साल2024 में 12 महीने की 12 बड़ी भविष्यवाणी?जनवरी से दिसंबर तक हो सकती हैं ये …

साल 2024 को लेकर डरावनी बडी भविष्यवाणी? नया साल मचाएगा तबाही,भूकंप और अकाल

साल 2024 को लेकर डरावनी बडी भविष्यवाणी? नया साल मचाएगा तबाही,भूकंप और अकाल टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *